शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये ९ जिल्ह्यांत १ लाख ८९ हजार लोकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 03:31 IST

लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यातील नऊ जिल्ह्यांत पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गुरुवारी आणखी एक जण मरण पावला, तर सुमारे १ लाख ८९ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.धेमाजी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या नैसर्गिक संकटात आजवर मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे. आसाममध्ये येत्या पाच दिवसांत संततधार कोसळतच राहील. ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, गोलाघाट, जोरहाट, मजुली, शिवसागर, दिब्रुगढ, तीनसुकिया जिल्ह्यांतील ४९२ गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या धेमाजी, मजुली, शिवसागर, तीनसुकिया जिल्ह्यांतील साडेअकरा हजार नागरिकांनी ४९ निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पुरामुळे १९,४३० हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने नेमातीघाट, धुब्री, तेजपूर येथे तर दिसांग, धनसिरी, जिया भारली या उपनद्यांनी शिवसागर, गोलाघाट, सोनीतपूर या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिब्रुगढ शहराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. प्रचंड पाऊस पडल्याने तेथे सर्वत्र पाणी साचले आहे. दिब्रुगढमधील दहा वॉर्डांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावाआसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद््भवलेल्या परिस्थितीचा गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला. पुराचा तडाखा बसलेल्या भागांची माहिती जाणून घेण्यासाठी सोनोवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश सोनोवाल यांनी या बैठकीत दिले आहेत.———————>दोन आठवड्यांपूर्वीच मान्सून देशभरातनवी दिल्ली : नैर्ऋत्य मान्सून नियोजित अवधीपूर्वीच देशभर व्यापला आहे. १ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगर या शेवटच्या ठिकाणी मान्सून पोहोचण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागतात. यावर्षी मात्र वेगाने आगेकूच करीत मान्सून देशभर सर्वत्र पोहोचला, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.नैर्ऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अन्य भागांत पोहोचला आहे.असून, मान्सून २६ जून रोजी देशभर व्यापला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनने वायव्येकडे कूच केली आहे. मध्य भारतातील चक्रीवादळाच्या संचारामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास मदत मिळाली. ८ जुलै रोजी मान्सून देशभर व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.२०१३ मध्ये मान्सून १६ जून रोजी देशभर व्यापला होता. त्यावेळी उत्तराखंडमध्ये मोठा पूर आला होता. यावर्षी मान्सून वेगाने आगेकूच करून देशभर व्यापला आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.पुढील तीन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राजस्थानमध्ये सर्वत्र पाऊस...नैर्ऋत्य मान्सून राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला असून, विविध ठिकाणी पाऊस झाला. जयपूर येथील हवामान केंद्राचे संचालक शिव गणेश यांनी सांगितले की, अंदाजापेक्षा एक दिवस आधीच २४ जून रोजीच मान्सूनचे राजस्थानात आगमन झाले. राज्यातील सर्व ३३ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पाऊस झाला.—————————