काश्मीरमध्ये चकमकीत १ जवान शहीद

By Admin | Updated: August 30, 2014 12:34 IST2014-08-30T12:34:09+5:302014-08-30T12:34:29+5:30

जम्मू- काश्मीरमधील कूपवाड जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून आणखी एक जण जखणी झाला आहे.

1 jawan martyr in Kashmir encounter | काश्मीरमध्ये चकमकीत १ जवान शहीद

काश्मीरमध्ये चकमकीत १ जवान शहीद

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. ३० - जम्मू- काश्मीरमधील कूपवाड जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून आणखी एक जण जखणी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात केरन सेक्टरमध्ये शनिवार सकाळपासून सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. तीन दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र यात एक जवान शहीद झाला. तर जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Web Title: 1 jawan martyr in Kashmir encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.