शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirusVaccine : सिरम तयार करणार लसींचे १ अब्ज डोस, २०२१ पासून प्रत्येक तिमाहीत किमान १ लस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 09:12 IST

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राजेनेका या कंपनीशी भागीदारी केली आहे.

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाच वेगवेगळ्या कोरोना लसींचे १ अब्ज डोस तयार करणार आहे. जगभरात या लसींचे वितरण केले जाईल. कोविशिल्ड, कोवोवॅक्स, कोविव्हवॅक्स, कोविवॅक आणि एसआयआय या लसींचा त्यात समावेश आहे. २०२१ च्या वर्षाअखेरीपर्यंत हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. 

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राजेनेका या कंपनीशी भागीदारी केली आहे. ४ आम्ही आधीच २ ते ३ कोटी डोस तयार करत असून ही संख्या महिन्याला ७ ते ८ कोटींपर्यंत नेऊ शकतो. मात्र, लसीच्या आयुर्मानाची मर्यादा लक्षात घेता आम्ही जाणीवपूर्वक कमी उत्पादन करत आहोत, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. कोवोवॅक्स ही दुसरी लस सिरम इन्स्टिट्यूट लाईफ सायन्सेस या नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कंपनीमार्फत विकसित केली जाणार आहे. 

बायोटेक कंपनी नोवोवॅक्सच्या सहयोगाने ही लस तयार केली जात आहे. कोवोवॅक्स लसीची पहिली चाचणी मे २०२० मध्ये आॅस्ट्रेलियात सुरू झाली. तिचा दुसरा टप्पा आता सुरू होईल. २०२१ मध्ये सिरमच्या मदतीने १ अब्ज डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.

कोविशिल्डपासून सुरुवात कोविशिल्ड या लसीपासून आम्ही सुरुवात करणार असून २०२१ च्या सुरुवातीपासून प्रत्येक तिमाहीत किमान एक लस लाँच करण्याचा आमचा प्रयत्न आहे.    - अदर पुनावाला, सीईओ, सिरम     इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रmedicineऔषधं