शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

०९... सावनेर.....लाईन

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

उच्च दाबाच्या लाईनसाठी तारांऐवजी केबल टाकणार

उच्च दाबाच्या लाईनसाठी तारांऐवजी केबल टाकणार
पालकमंत्र्यांची माहिती : नागरी वस्तीत धोका उद्भवण्याची शक्यता
सावनेर : स्थानिक शहरातील नागरी वस्त्यांमधून ११ के व्ही क्षमतेची विद्युत लाईन केली आहे. या तारांमुळे भविष्यात उद्भवणारा धोका विचारात घेता त्या ठिकाणी केबल टाकण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सावनेर शहरातील वॉर्ड क्रमांक -१, २, ३ व ५ मधील बसस्थानक परिसर, जवाहर कन्या शाळा, अवधूतवाडी, तहसील कार्यालय परिसर आदी ठिकाणाहून ११ केव्ही क्षमतेची विद्युत लाईन केली आहे. हा संपूर्ण परिसर दाट लोकवस्तीचा असून, लहान मुले घराच्या छतावर नेहमीच खेळतात. शिवाय, या भागांमध्ये इमारतींचे बांधकामही सुरू असते. त्यामुळे विजेच्या धक्क्याने जीवित हानी होण्याची शक्यता लक्षात घेता, या ठिकाणी तारांऐवजी केबल टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी फार पूर्वी केली होती. त्या मागणीकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले.
मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर मागणी गांभीर्याने घेत त्या लाईनच्या तारा हटवून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी अंदाजे १० ते १५ लाख रुपये खर्च येणार असून, हा खर्च स्थानिक नागरिक अथवा पालिका प्रशासन करू शकत नाही. त्यामुळे सदर कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचा पालिका प्रशासनाने ठराव पारित केला होता. माजी नगराध्यक्ष ॲड. अरविंद लोधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. त्यावर सहायक अभियंता यांना केबल टाकण्याचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव मार्गपूर्वी डीपीडीसीला पाठविण्याची सूचना बावनकुळे यांनी केली. सदर काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
***