सिन्नर शहरात अवैद्यरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यास जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:33 IST2019-03-27T17:33:45+5:302019-03-27T17:33:59+5:30
सिन्नर : शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने संशयितरित्या फिरत असलेल्या इसमास नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

सिन्नर शहरात अवैद्यरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यास जेरबंद
सिन्नर : शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने संशयितरित्या फिरत असलेल्या इसमास नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल, २ मॅगझिन व ३ जीवंत काडतुसे असे अग्निशस्त्रे मिळून आले.
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुशंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैध धंद्यांचे उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्याबाबत तसेच जिल्हयातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या शहरांमध्ये परराज्य व बाहेरील जिल्ह्यांतून शस्त्रांची देवाण-घेवाण करणारे इसमांचा कसोशीने शोध घेणेबाबत सूचना दिल्या आहे.