विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेची चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:27 IST2019-03-04T00:27:05+5:302019-03-04T00:27:17+5:30
नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेची चालढकल
नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
शिक्षण अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार उच्च प्राथमीक शाळेत विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या विषय संवर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अहर्ताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात अशी तरतूद आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विज्ञान विषयाच्या शिक्षकांची ६०० च्या वर पदे रिक्त आहेत. विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यास कार्यरत शिक्षकांमधून जे शिक्षक १२ वी विज्ञान व डीएड असतील अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या जागेवर करण्यात यावी. असा शासनाचा १३ आॅक्टोबर २०१६ चा निर्णय आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, पालघर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया २०१७ मध्येच पूर्ण करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मात्र २०१६ पासून कासवगतीने काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २ मार्च रोजी शिक्षकांना समुपदेशनासाठी पत्र काढले; मात्र अवघ्या ३ तासांतच शिक्षण विभागाने ते पत्र रद्द केले. या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ही प्रक्रि या पूर्ण केल्यास उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान पदवीधर शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे, या साठी ही प्रक्रि या आचारसंहीते पूर्वी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी शिक्षक व पालकवर्गाकडून होत आहे. जिल्हा परिषदेच्या या अजब निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.