जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिका प्रस्तावाला अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:23+5:302021-09-18T04:16:23+5:30
मार्च महिन्यात जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे पडून असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा केला असता, त्याबाबत ...

जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिका प्रस्तावाला अखेर मंजुरी
मार्च महिन्यात जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे पडून असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा केला असता, त्याबाबत मंजुरीचे पत्र शुक्रवारी (दि.१७) जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून ३५ रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असून, सर्व रुग्णवाहिका ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.
चौकट==
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची रुग्णवाहिकेची निकड लक्षात घेता प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने गेल्या सव्वा वर्षात आरोग्य विभागाच्या ताफ्यात ५२ नवीन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. यापूर्वी एचएएल, इंडिया बुल्स या कंपन्यांनी सीएसआर फंडातून नवीन अद्ययावत रुग्णवाहिका दिल्या तर राज्य शासनानेही काही रुग्णवाहिका पाठविल्या होत्या. आता पुन्हा ३५ रुग्णवाहिका खरेदीची अनुमती मिळाल्याने आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे.