कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र जिल्हा परिषदच करणार तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST2021-02-05T05:36:36+5:302021-02-05T05:36:36+5:30
दोन महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनाावट स्वाक्षरीचा उपयोग करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परस्पर कर्मचारी भरती करून घेण्याचा ...

कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र जिल्हा परिषदच करणार तयार
दोन महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनाावट स्वाक्षरीचा उपयोग करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परस्पर कर्मचारी भरती करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला होता. ज्या व्यक्तीने बनावट नियुक्तीपत्र सादर केले त्याच्या जवळ जिल्हा परिषद कर्मचारी असल्याचे ओळखपत्र देखील सापडले होते. बांधकाम विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने ते ओळखपत्र तयार करून दिल्याची बाब पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र रद्दबातल ठरवित नव्याने ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासकीय मुद्रणालयातून बारकोड असलेले ओळखपत्र तयार करून घेण्याची तयारी करण्यात आली व तसा पत्रव्यवहारही केला गेला. मात्र शासकीय मुद्रणालयाने अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तयार करून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता खासगी व्यक्तीकडून सर्व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तयार करून घेण्याचे ठरविण्यात आले असून, नवीन ओळखपत्राची नक्कल होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.