शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

फी मागणाऱ्या शाळांना जिल्हा परिषदेची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 4:42 PM

केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू करून लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये, दुकाने, कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांनाही पंधरा दिवसांपूर्वीच सुट्या जाहीर करून गर्दी

ठळक मुद्देतगादा : विद्यार्थी, पालकांचा आर्थिक छळइयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा रद्द केल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांना शासनाने सुटी जाहीर केलेली असतानाही काही खासगी अनुदानित, विनाअनुदानित संस्थाचालकांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लाावला जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या असून, सध्या आपत्कालीन परिस्थिती लागू असताना अशाप्रकारे शैक्षणिक शुल्क भरण्यास भाग पाडणे कायदेशीर नसून, संबंधितांवर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू करून लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये, दुकाने, कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांनाही पंधरा दिवसांपूर्वीच सुट्या जाहीर करून गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा रद्द केल्या असून, दहावीचा एक पेपरही पुढे ढकलण्यात आला आहे. शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असताना रिझर्व्ह बॅँकेनेदेखील सर्व प्रकारच्या कर्जवसुलीवर निर्बंध लावलेले आहेत. असे असतानाही शहर व जिल्ह्यातील काही खासगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थेचे शिक्षक, मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थी, पालकांना तगादा लावला जात आहे. मुळातच नागरिकांचे कामधंदे, व्यवसाय बंद झालेले असताना शाळा चालकांकडून केल्या जात असलेल्या आर्थिक छळवणुकीबाबत काही पालकांनी थेट जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी सर्व शाळा व संस्थाचालकांना पत्र पाठवून कोणत्याही पालकांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करू नये अन्यथा तक्रारी आल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक