जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला वृत्तपत्र वाचनाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:20 PM2020-01-19T18:20:10+5:302020-01-19T18:21:35+5:30

पाटोदा : येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील जिल्हा परिषद शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांना वर्तमान पत्र वाचनाचा अनुभव देण्यात आला.

Zilla Parishad school students have experience reading newspaper | जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला वृत्तपत्र वाचनाचा अनुभव

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला वृत्तपत्र वाचनाचा अनुभव

Next
ठळक मुद्देसर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वर्तमान पत्र उपलब्ध करून देण्यात आले.

पाटोदा : येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील जिल्हा परिषद शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांना वर्तमान पत्र वाचनाचा अनुभव देण्यात आला.
मोबाइल आणि टि. व्ही. च्या युगात विद्यार्थी वाचनाकडे दुर्लक्ष करतात. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी लागावी तसेच जगात कुठे काय चालू आहे, याचा वेध घेण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा यासाठी जि. प. शाळा आडगाव रेपाळ येथे पाटोदा येथील प्रज्ञा न्यूज पेपर एजंशीच्या वतीने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वर्तमान पत्र उपलब्ध करून देण्यात आले.
विद्यार्थ्यांना हेडलाईन्स वाचायला सांगितल्या. मधून वेगवेगळ्या पानांवरील प्रश्न विचारण्यात आले. वर्तमान रमून गेले होते. दैनिक परीपाठ अशा बाबी विद्यार्थ्यांना आवडल्या. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त वेगळा विषय व अवांतर वाचन करतांना विद्यार्थी आनंदीत झाले होते.
मुख्याध्यापक रमेश उगले, पदवीधर शिक्षिका सुमन नाईकवाडे, उपशिक्षक शिवाजी आहेर, विकास कदम, राहुल चौधरी यांनी या उपक्र म यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना आगळ्यावेगळ्या उपक्र माचा अनुभव दिल्याबद्दल सरपंच रेखा जगताप, माजी सरपंच नारायण गुंजाळ, ग्रामसंचाय सदस्य पांडुरंग गायके तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण निकम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी शिक्षकांचे कौतूक केले. या उपक्र माचे संयोजन व सूत्रसंचलन शिक्षक सुरज झाल्टे यांनी केले.
(फोटो १९ पाटोदा १)

Web Title: Zilla Parishad school students have experience reading newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.