शहा विद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 18:59 IST2019-12-15T18:59:05+5:302019-12-15T18:59:35+5:30

सिन्नर तालुक्यातील शहा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्राथमिक शाळेच्या शहा केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे उदघाटन भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गडाख व केंद्र प्रमुख जीजाभाऊ घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Zilla Parishad President Contest at Shah School | शहा विद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा

शहा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात स्पर्धेचे उद्धाटन करताना जीभाऊ घोंगडे. समवेत सुनील गडाख, मधुकर सूर्यवंशी, प्रमोद राऊतराय आदी.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
प्राथमिक शाळेच्या शहा केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे उदघाटन भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गडाख व केंद्र प्रमुख जीजाभाऊ घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे आणि खेळातून त्यांच्यामध्ये खिलाडी वृत्ती निर्माण होणे हा या स्पर्धेच्या पाठीमागील उद्देश असल्याचे केंद्रप्रमुख घोंगडे यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेमध्ये ११ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत कब्बडी, खो खो याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी बबन गोसावी, शिवाजी जाधव, हनुमंत तगड, रमेश दळवी, माधव जगताप, काशीनाथ वानोळे, सचिन गांगवे, सुनील जाधव, मनोज बागडे, अशोक वारे, किरण हासे, सुनील साबळे, जयश्री रब्बेवार, शोभा शेळके, अश्विनी गणाचार्य आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad President Contest at Shah School