जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:29 IST2021-07-15T23:42:19+5:302021-07-16T00:29:24+5:30

दिंडोरी : अखिल भारतीय व राज्य सरकार, जिल्हा परिषद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१५) विविध सार्वजनिक मागण्यांसाठी राष्ट्रीय विरोधी दिन म्हणून पाळण्यात आला.

Zilla Parishad, Gram Panchayat employees' agitation | जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कर्मचारी महासंघ व विविध कर्मचारी संघटनेतर्फे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देताना नंदू पवार. समवेत ग्रामसेवक संघटनेचे सोमनाथ ढोकरे पाटील, संतोष नवले, गायकवाड आदीसह कर्मचारी.

ठळक मुद्देकाळ्याफिती लावून शासकीय कामकाज केले.

दिंडोरी : अखिल भारतीय व राज्य सरकार, जिल्हा परिषद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१५) विविध सार्वजनिक मागण्यांसाठी राष्ट्रीय विरोधी दिन म्हणून पाळण्यात आला.

जिल्हा परिषद मुख्यालय , पंचायत समिती कार्यालये, प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पशु वैद्यकीय दवाखाने आणि जिल्हा परिषद अंतर्गत इतर विविध संवर्ग कार्यालयातील कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून शासकीय कामकाज केले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तालुका महासंघ व सर्व कर्मचारी संघटनेचे तालुका पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली सर्व पंचायत समिती आवारात निदर्शने करून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

Web Title: Zilla Parishad, Gram Panchayat employees' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.