जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:06 IST2020-03-03T17:05:58+5:302020-03-03T17:06:12+5:30
डांगसौदाणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा साकोडे (ता. बागलाण) येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला.

जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
डांगसौदाणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा साकोडे (ता. बागलाण) येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे तर प्रमुख मान्यवर म्हणून जि. प. सदस्य गणेश अहिरे, माजी सदस्य केदुबाई सोनवणे, केंद्रप्रमुख पी. एच. बधान, सरपंच रामचंद्र बहिरम, उपसरपंच जानका सोनवणे, विस्ताराधिकारी एन. एस. देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ देशमुख, वैशाली गांगुर्डे, मिराबाई गांगुर्ड,े रामदास मोरे, ग्रामसेवक एस. टी. सावकार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र गांगुर्डे व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्र माची सुरु वात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यांनतर विद्यार्थानी वेगवेगळे नृत्याविष्कार तसेच नवनवीन गिते सादर केली. आदिवासी भागातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे आमदार बोरसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. गणेश अहिरे, नितीन देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.