पंधरा दिवसापासून परिसरात मादी बिबट्या व तीन बछडे वावरताना ग्रामस्थांनी पाहिले होते. बिबट्याने हल्ला करून कुत्र्यांचा फडशा पाडला होता. शेतकºयांनी या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावल्यानतंर संध्याकाळच्या सुमारास एक बछडा अलगद पिंजºयात जेरबंद झाला. वनविभागाच्या कर्मचाºयांनी बछड्याची मादी पुन्हा पिंजºयाजवळ येईल या अपेक्षेने बछड्याला तेथेच ठेवले आहे.