निर्यातमूल्य शून्य, तरीही कांदा कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:09 IST2018-03-15T23:09:45+5:302018-03-15T23:09:45+5:30
सायखेडा : सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली असून, निर्यातमूल्यदेखील शून्य केले आहे; तरीसुद्धा कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालय यांच्याशी चर्चा करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी पत्राद्वारे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महिन्यापूर्वी २५०० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा आज अवघा ५०० ते ६०० रुपये
प्रतिक्विंटल विकला जात आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांद्यासाठी मोठा खर्च शेतकºयांना करावा लागला आहे.बाजारभावात खर्चसुद्धा वसूल होत नसल्यामुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मध्यस्थी करून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सरकारने नाफेड आणि इतर विविध प्रकारच्या यंत्रणांद्वारे कांदा खरेदी करावा, कांद्यास उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. देशांतर्गत विविध राज्यांत कांदा विक्रीसाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाºयांना वॅगन उपलब्ध करून द्याव्या, मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर खरेदी हस्तक्षेप कमी करावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.