सलग दुसऱ्या दिवशी बळी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 01:29 IST2022-03-04T01:29:19+5:302022-03-04T01:29:41+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३) एकूण ३६ नागरिक बाधित आढळून आले असून, ४८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याने कोरोनाबळींची संख्या ८,८९७ वर कायम राहिली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी बळी शून्य
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३) एकूण ३६ नागरिक बाधित आढळून आले असून, ४८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याने कोरोनाबळींची संख्या ८,८९७ वर कायम राहिली आहे. जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींची संख्या तीनशेच्या खाली आली असून, २९० वर आली आहे. दरम्यान, कोरोना प्रलंबित अहवालांची संख्या ७९७ असून, कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट १.१२ टक्के तर कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९८.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे.