युवकास मारहाण

By Admin | Updated: June 28, 2015 01:47 IST2015-06-28T01:46:46+5:302015-06-28T01:47:15+5:30

युवकास मारहाण

Yuvas beat up | युवकास मारहाण

युवकास मारहाण

नाशिक : के.टी.एच़एम़ महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकास मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़२७) दुपारी घडली़ मारहाण झालेल्या युवकाचे नाव अजिंक्य प्रकाश धुळेकर असे असून, तो मल्हारखाण येथील रहिवासी आहे़ या मारहाणीमध्ये त्याच्या तोंडास व पाठीस मार लागला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या घटनेची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, मारहाण झालेला विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे का? नसल्यास तो महाविद्यालय प्रांगणात का आणि कसा आला, असे विविध प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Yuvas beat up