संवादातून तरुणांच्या समस्या सुटतील : विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:40 IST2019-05-18T00:39:19+5:302019-05-18T00:40:29+5:30
तरुणाईला चांगल्या वाईटाची समज नसते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कोणीही नाही, या वयात मुले सैराटपणे का वागतात, व्यसनांच्या आहारी का जातात त्यांच्यासमोरील नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तरुण पिढीशी संवाद साधणे आवश्यक असून, संवादातून तरुणांच्या समस्या निश्चितच सुटू शकतील, असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.

संवादातून तरुणांच्या समस्या सुटतील : विश्वास नांगरे-पाटील
नाशिक : तरुणाईला चांगल्या वाईटाची समज नसते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कोणीही नाही, या वयात मुले सैराटपणे का वागतात, व्यसनांच्या आहारी का जातात त्यांच्यासमोरील नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तरुण पिढीशी संवाद साधणे आवश्यक असून, संवादातून तरुणांच्या समस्या निश्चितच सुटू शकतील, असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.
गोदाघाटावरी यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेत १७वे पुष्प गुंफतांना लक्ष्मणराव (काका) तांबे स्मृतिप्रीत्यर्थ ‘युवकांसमोरील आव्हाने आणि अपेक्षा’ विषयावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी व्याख्याने दिले. सध्याची परिस्थिती युवकांसाठी संक्रमणाची आहे. या संक्रमणावस्थेचा सामना करण्याचे आव्हान युवकांसमोर आहे. ते पेलण्यासाठी युवक चारित्र्यसंपन्न, करुणाशील, धाडशी, तेजस्वी असला पाहिजे. त्यासाठी मूल आईच्या कुशीत असल्यापासून ते शाळा, महाविद्यालयांसह कुटुंब आणि समाजातही त्याच्यावर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, विलास ठाकूर, बापूसाहेब कापडणीस, डॉ. प्रदीप पवार, नवलनाथ तांबे, शैला तांबे आदी उपस्थित होते.
आजचे व्याख्यान
वक्ता : विनायक रानडे
विषय : ग्रंथ तुमच्या दारी :
एक चळवळ देशात-विदेशात
वसंत व्याख्यानमाला