राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे
By Admin | Updated: November 19, 2014 01:13 IST2014-11-19T01:13:22+5:302014-11-19T01:13:59+5:30
माणिकराव साळुंखे : मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवास प्रारंभ

राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे
नाशिक : खेळामुळेच जीवनात मोठी उंची गाठता येते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी तरु ण युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. जगात सर्वांत मोठी युवापिढी भारतात असून, देश महासत्ता बनविण्याची ताकद नवयुवकांत आहे, असे मत कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले़ केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित केंद्रीय क्र ीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होते़ डॉ. साळुंखे व केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन झाले. प्रारंभी विद्यापीठाच्या औरंगाबाद, अमरावती, कल्याण, कोल्हापूर, मुंबई, नांदेड, नागपूर, पुणे, आणि नाशिक या विभागीय केंद्रांच्या संघांनी मैदानावर संचलन करून प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी उपकुलसचिव केशवराव म्हस्के यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे प्रमुख श्याम पाडेकर यांनी प्रास्ताविक, तर क्र ीडा संचालक प्रा. बाजीराव पेखळे यांनी सूत्रसंचालन केले.