पाणी भरण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू
By Admin | Updated: May 11, 2017 00:39 IST2017-05-11T00:38:23+5:302017-05-11T00:39:35+5:30
जायखेडा : मालेगाव तालुक्यातील वळवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या राहुल मांगू पाटील (१५) याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जायखेडा : मालेगाव तालुक्यातील वळवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या राहुल मांगू पाटील (१५) याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. वळवाडे येथील पाणीटंचाईचा हा दुसरा बळी आहे.
जेसीबीने सुमारे पंधरा फूट खड्डा केला आहे. तलावापासून दहा फूट अंतर असल्याने विहिरीत बऱ्यापैकी पाणी होते. सकाळी घरात पाणी नसल्याने राहुल पाणी आणण्यासाठी गेला असता ही घटना घडली. या प्रकरणी वडनेर पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील नागरिक गावठाण विहिरीवरून पाणी आणतात. गावठाणच्या जुन्या विहिरीवरही रखमाबाई लोटन सोनवणे या महिलेचा पाणी भरण्यासाठी गेली असता मृत्यू झाला होता.