प्रेमसंबंधाच्या संशयातून युवकावर कोयत्याने सपासप वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:18 IST2021-09-05T04:18:39+5:302021-09-05T04:18:39+5:30
गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ असलेल्या ओम शुभम अपार्टमेंटच्या सहा क्रमांकाच्या सदनिकेत राहणारा राहुल शहाजी निखाडे (२२) हा हल्लेखोरांच्या ...

प्रेमसंबंधाच्या संशयातून युवकावर कोयत्याने सपासप वार
गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ असलेल्या ओम शुभम अपार्टमेंटच्या सहा क्रमांकाच्या सदनिकेत राहणारा राहुल शहाजी निखाडे (२२) हा हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाला आहे. संशयित उदय अरुण तिडके याने त्याच्या दोघा साथीदारांसह गुरुवारी (दि. २) रात्री दहा वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला. या वेळी तिघांनी फिर्यादी राहुल याचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात राहुल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर, हातावर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी राहुलला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ४) संध्याकाळपर्यंत या गुन्ह्यात एकाही संशयिताला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नव्हते. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पतकी हे करीत आहेत.