धोंडगव्हाण येथे तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:03 IST2018-10-15T19:02:27+5:302018-10-15T19:03:22+5:30
चांदवड तालुक्यातील धोंड्गव्हान येथे किरकोळ वादातून - लखण अर्जुन चहाळे वय २० या तरु णाची हत्या झाली.

धोंडगव्हाण येथे तरुणाची हत्या
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील धोंड्गव्हान येथे किरकोळ वादातून - लखण अर्जुन चहाळे वय २० या तरु णाची हत्या झाली.
याबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी घटना घडल्याच्या काही मिनीटात गुन्ह्यातील मुख्य संशयीत दिगंबर नामदेव कडाळे व संदीप कांताराम कडाळे यांना पिंपळगाव बसवंत येथून उंबरखेड रोडवरील कांदा चाळीत लपून बसलेले असतांना पकडण्यात आले. धोंडगव्हाण येथील लखन चहाळे व दिगंबर कडाळे यांचा दोघांमध्ये दि. १३ रोजी रात्री शनी चौकात किरकोळ कारणांवरून वाद झाला दरम्यान काल दि. १४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत आवारात लखन चहाळे यांच्याशी वाद घालून संशयीत दिगंबर नामदेव कडाळे व संदीप कांताराम कडाळे यांनी धारदार शस्त्राने लखन याच्या पोटात वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सचिन साळुंके यांनी फौज फाट्यासह काही मिनीटात घटना स्थळी जाऊन तपास चक्र हलविले. गोपनीय माहिती व शिताफीने केलेल्या तपासा मुळे पळून जाणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आले. गुन्ह्या संदर्भातील पाच जणांना संशयिताचा तपास सुरु आहे. चांदवड न्यायालयाने संशयीतांना पोलीस कोठडी सुनावली आहे. लखन चहळे यांच्यावर पोलीस बदोबस्तांत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कण्यात आले.