युवकावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:18 IST2020-08-24T23:29:16+5:302020-08-25T01:18:16+5:30
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने युवकावर कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२३) दुपारी देवळाली गाव येथे घडली.

युवकावर कोयत्याने हल्ला
ठळक मुद्देयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने युवकावर कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२३) दुपारी देवळाली गाव येथे घडली. अमान किर, अनुपम, सन्नी (पुर्ण नावे नाहीत, रा. देवळाली गाव ) व त्यांचे अन्य पाच साथीदार यांनी मिळून हल्ला चढविला, असे फिर्यादीत म्हटले आहे. गौरव मनोहर भालेराव (१८, रा. देवळाली गाव,) हा रविवारी कब्रस्तानस्थानजवळ मोबाईलवर गेम खेळत असताना टोळके तेथे आले. दोन वर्षांपुर्वी भांडण केलेल्या गौरवच्या मित्राची माहिती विचारत त्यांनी गौरवला मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.