वाकी बुद्रूक येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:04 IST2016-08-18T02:04:02+5:302016-08-18T02:04:29+5:30
वाकी बुद्रूक येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

वाकी बुद्रूक येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू
चांदवड : तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील वीस वर्षीय तरुणाचा गोईनदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तुषार विजय अहिरे (२०), रा. वाकी बुदू्रक हा बुधवारी (दि. १७)सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गोईनदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चांदवड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते व सहायक पोलीस उप- निरीक्षक आर. एस. मार्तंड करीत आहेत. (वार्ताहर)