युवकांनी केला गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:28 AM2019-12-29T00:28:22+5:302019-12-29T00:28:54+5:30

मविप्र समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सीएमसी विद्यालय, कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालय यांचा संयुक्त राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 The youth transformed the village | युवकांनी केला गावाचा कायापालट

युवकांनी केला गावाचा कायापालट

Next

मातोरी : मविप्र समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सीएमसी विद्यालय, कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालय यांचा संयुक्त राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मातोरी व दरी गावातील परिसराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गावाचे पूर्ण रूपडे या विद्यार्थ्यांनी बदलवून दाखवले. प्राथमिक आरोग्य रुग्णालय परिसरात आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते.
या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण साफसफाई केली. गावातील गल्लीबोळात स्वच्छ करत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याविषयी माहिती दिली. दरी गावात ही केलेली साफसफाई प्रशंसनीय ठरली. ग्रामदैवत दरी आई माता परिसर येथे मागील पावसात दरड कोसळल्याने पायरी वर मोठ्या प्रमाणात पाडलेली दगडे दोन दिवस काम करत भाविकांचा मार्ग मोकळा केला. यामुळे भाविकांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याविषयी गावातील मंदिरात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी उदय चौधरी, सुनील वारुंगसे, युवराज चौधरी, एस. पी. कमानकर, व्ही. एस. क्षीरसागर, आर. एस. सोनवणे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
श्रमदान
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गावात मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील युवक युवतींनी श्रमदानातून मातोरी व दरी गावाचा कायापालट केला. तसेच पाणी व्यवस्थापनाचे नियोजन केल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तर विद्यार्थिनींनी बेटी बचाव याबाबत चौक चौकांत पथ नाट्याद्वारे जनजागृती करत गावातून फेरी काढली. या मोहिमेमुळे गावातील महिला व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे.
जनजागृती फेरी
दरी, मातोरी गावाच्या परिसरात विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव’ याबाबत चौक चौकांत पथ नात्याद्वारे जनजागृती केली. याविषयी महिलांनी या कार्यक्र मात सहभागी होत गावातून फेरी काढली, कामाची माहिती मविप्र नीलिमा पवार यांनी स्वत: पाहणी केली. यावेळी वन विभागाने लागवड केलेल्या पंधरा हजार वृक्षांची मशागत वाफे करणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

Web Title:  The youth transformed the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक