समिट स्टेशन येथील तरुणांनी वाचवले हरणाचे प्राण !

By Admin | Updated: August 29, 2015 00:07 IST2015-08-29T00:07:32+5:302015-08-29T00:07:55+5:30

समिट स्टेशन येथील तरुणांनी वाचवले हरणाचे प्राण !

The youth of the Summit station saved the beard! | समिट स्टेशन येथील तरुणांनी वाचवले हरणाचे प्राण !

समिट स्टेशन येथील तरुणांनी वाचवले हरणाचे प्राण !

 तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीनजीक तीन किलोमीटर अंतरावर समिट रेल्वे स्टेशनजवळ अशोक पांडुरंग बढे यांनी त्यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांनी एक हरीण पडलेले बघितले.
मित्रपरिवाराला बोलावून त्यांनी घडलेला प्रकार चांदवड पोलीस स्टेशन व वनरक्षक एम.बी. पवार यांना कळविला. सकाळी ११ वाजता एम.बी. पवार व शिवाजी कदम यांनी प्रयत्न करून घटनास्थळी येऊन दोराच्या साहाय्याने फक्त दीड फूट टॅँकरने सोडलेल्या पाण्यातून हरणाला विहिरीबाहेर काढले व त्याचा प्राण वाचवला.
समिट परिसरात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने ते पाण्याच्या शोधात नागरीवस्त्यांकडे येतात. त्यातूनच हे हरीण विहिरीत पडले. परिसरात पाण्याची तीव्र टंचाई असून, परिसरातील शेतकरीही टॅँकरने पाणी आणून विहिरीत सोडतात व पिकांना पाणी देतात. त्यात आजच विहिरीत फक्त टॅँकरने आणून टाकलले पाणी दीड फूट असल्याने हे हरीण वाचले.
परिसरातील नागरिकांनी वनरक्षक व डॉ. वाघमोडे यांच्या ताब्यात जखमी हरीण दिले.
त्यांनी उपचार केल्याने हे हरीण वाचले.
परिसरात असलेल्या हरिणांना पाण्याची सोय करावी, अशी मागणी अशोक बढे, राजू बढे, सुनील दुधे, सुधाकर सोमवंशी, मंगेश बढे,
गोविंद दुधे, पप्पू साळुंके, गणेश दुधे, सोनू सोमवंशी, बाबाजी चिंचोले, अमोल बढे यांनी केली व हे
हरीण विहिरीतून बाहेर काढण्यासाठी या तरुणांनी मदत
केल्यानेच हे हरीण वाचू शकले. (वार्ताहर)

Web Title: The youth of the Summit station saved the beard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.