वडनेर दुमालात युवकाची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 20:03 IST2017-08-06T17:44:55+5:302017-08-06T20:03:42+5:30

वडनेर दुमालात युवकाची आत्महत्त्या
ठळक मुद्देरोगर किटकनाशक सेवनउपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोेंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पिकावरील रोगर किटकनाशक सेवन करून ३३ वर्षीय युवकाने आत्महत्त्या केल्याची घटना वडनेर दुमाला येथील साईदत्तनगरमध्ये घडली आहे़ दत्तात्रय शांताराम पोरजे असे आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय पोरजे याने शनिवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरी रोगर किटकनाशक सेवन केले़ ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
दरम्यान, किटकनाशक प्राशन करण्याचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोेंद करण्यात आली आहे.