येवल्यात प्रेमसंबंधातून युवतीची आत्महत्त्या
By Admin | Updated: August 2, 2016 01:15 IST2016-08-02T01:15:39+5:302016-08-02T01:15:50+5:30
येवल्यात प्रेमसंबंधातून युवतीची आत्महत्त्या

येवल्यात प्रेमसंबंधातून युवतीची आत्महत्त्या
येवला : शहरात एका नवयुवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमागे प्रेमसंबंध असावेत, असा संशय आहे. संशयिताने आपल्या मुलीस आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद युवतीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेऊन आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वैजापूर तालुक्यातील बाजाठाण येथील मूळ रहिवाशी व सध्या येवला येथील सिद्धार्थ लॉन्सवर वाँचमन म्हणून काम करीत असलेले गोरखनाथ मारुती खोसरे (४२) यांनी येवला शहर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मुलगी सोनाली गोरखनाथ खोसरे (२०) हिचे संशयित पप्पू ऊर्फ हितेंद्र भीमराज गोसावी (रा. बाजारतळ, येवला) याच्याशी प्रेमसंबंध असावेत. या युवकाने तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केले, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्तेचे गूढ उकलण्याचे पोलीसापुढे आव्हान आहे. (वार्ताहर)