बँकेत सापडलेले पैशांचे पाकीट युवकाने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:11 IST2020-06-12T22:00:20+5:302020-06-13T00:11:51+5:30
ओझर : येथील सेवागीर गोसावी हे शुक्रवारी (दि. १२)ओझर मर्चण्ट बँकेत कामानिमित्त आले असता येथे त्यांच्या खिशातील पाकीट खाली पडले. काम आटोपल्यानंतर गोसावी घरी निघून गेले.

बँकेत सापडलेले पैशांचे पाकीट युवकाने केले परत
ओझर : येथील सेवागीर गोसावी हे शुक्रवारी (दि. १२)ओझर मर्चण्ट बँकेत कामानिमित्त आले असता येथे त्यांच्या खिशातील पाकीट खाली पडले. काम आटोपल्यानंतर गोसावी घरी निघून गेले. या पाकिटामध्ये सहा हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती. दरम्यान, परशराम दळवी यांना सदर पाकीट सापडले. त्यांनी ते शाखा व्यवस्थापक वृषाली राऊत यांच्याकडे प्रामाणिकपणे दिले. पाकिटातील महत्त्वाची कागदपत्रे पाहिल्यानंतर संबंधिताला ते मिळाले पाहिजे, या हेतूने या शाखा व्यवस्थापकांनी सेवागीर गोसावी यांस संपर्क साधता व त्यांना बँकेत बोलावून घेत कागदपत्रे व
रोख रक्कमेसह त्यांचे पाकीट परत केले. परशराम दळवी यांनी दाखवलेल्या प्रमाणिकपणाचे बँकेचे अध्यक्ष रवींद्र भट्टड, व्हा. चेअरमन संदीप अक्कर, जनसंपर्क संचालक प्रशांत चौरे यांच्यासह संचालक मंडळाने कौतुक केले.