गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 03:17 PM2018-10-06T15:17:53+5:302018-10-06T15:18:48+5:30

घोटी : इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आडवण गावातील एका पंचवीस वर्षीय संशयित युवकास शनिवारी घोटी पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.

Youth rescued with ditch cloth | गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

Next

घोटी : इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आडवण गावातील एका पंचवीस वर्षीय संशयित युवकास शनिवारी घोटी पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.पोलिसांनी त्याच्या ताब्यातील कमरेत लपवून ठेवलेला गावठी कट्टा व त्याच्याजवळील दुचाकी ताब्यात घेतली आहे. घोटी येथील टोल नाक्यावर एक युवक गावठी बनावटीचा कट्टा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती घोटी पोलिसांना मिळाली होती.यानुसार आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल धुमसे,रविराज जगताप,बाळकृष्ण केदारे,प्रकाश कासार,कृष्णा कोकाटे,संतोष दोंदे,शीतल गायकवाड,शरद,कोठुळे,संदीप मथुरे,महाले आदींच्या पथकाने घोटी टोल नाक्यावर सापळा लावला होता.यावेळी एक युवक एम.एच.१५,एफ.एक्स.७२४७ या क्र मांकाच्या पल्सर दुचाकीवरून टोल नाक्यावर आला असता पोलीसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र या बाबीची कुणकुण या युवकाला लागल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी त्याला फिल्मीस्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून वीस हजार रु पये किमतीचा गावठी कट्टा,व एक दुचाकी ताब्यात घेतली आहे. दरम्यान या युवकाचे नाव गोकुळ शिवाजी गणेशकर असे असून तो इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडवण गावचा असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली.दरम्यान घोटी पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Youth rescued with ditch cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक