दुचाकी अपघातात द्वारका परिसरातील युवक ठार

By Admin | Updated: March 14, 2017 21:31 IST2017-03-14T21:31:59+5:302017-03-14T21:31:59+5:30

दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात टाकळीरोड परिसरातील युवकाचा मृत्यू

Youth killed in a twin accident in Dwarka area | दुचाकी अपघातात द्वारका परिसरातील युवक ठार

दुचाकी अपघातात द्वारका परिसरातील युवक ठार

नाशिक : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात टाकळीरोड परिसरातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १३) दुपारच्या सुमारास सिडकोतील लेखानगर परिसरात घडली़ अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव विक्रांत सांगोडे (२६, रा. काशीविजय बंगला, अनुसयानगर, टाकळीरोड, द्वारका) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रांत सांगोडे हा दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, डीवाय २२२६) पाथर्डी फाट्याकडून नाशिककडे महामार्गावरील सर्व्हिस रोडने जात होता़ लेखानगरजवळील शिवाजी पुतळ्याजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो दुभाजकावर जाऊन आदळला़ यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Youth killed in a twin accident in Dwarka area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.