शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुगाव-गिरणारे रस्त्यावर युवक ठार; जमावाने टेम्पो पेटवून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:01 IST

मखमलाबादकडून कटलरी माल घेऊन गिरणारेच्या दिशेने चालक भरधाव टेम्पो (एमएच १५ एजी १६५१) घेऊन जात असताना चालकाने रस्त्यावरून गिरणारेकडे जात असलेल्या दुचाकीस्वार बाबूलाल बोबडे याच्या दुचाकीला (एमएच १५, बीएम ७९८६) पाठीमागून जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देआगीमध्ये सुमारे तीन लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान अपघाताची माहिती पोलिसांना कळवूनदेखील पोलीस घटनास्थळी उशिरा

नाशिक : मखमलाबादकडून भरधाव वेगाने गिरणारेकडे जाणा-या टेम्पोने दुगाव चौफुलीच्या पुढे रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार बाबूलाल रतन बोबडे (२०) हा जागीच ठार झाला. सदर घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर येथे जमलेल्या संतप्त जमावाने अपघातग्रस्त वाहन पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.मखमलाबादकडून कटलरी माल घेऊन गिरणारेच्या दिशेने चालक भरधाव टेम्पो (एमएच १५ एजी १६५१) घेऊन जात असताना चालकाने रस्त्यावरून गिरणारेकडे जात असलेल्या दुचाकीस्वार बाबूलाल बोबडे याच्या दुचाकीला (एमएच १५, बीएम ७९८६) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बोबडे हा जमिनीवर कोसळून जागीच ठार झाला. अपघात होताच टेम्पोचालकाने घटनास्थळी वाहन सोडून पळ काढला. सकाळच्या सुमारास अपघात झाल्यामुळे रस्त्यावरून फारशी वर्दळ नव्हती; मात्र अपघाताची वार्ता दुगाव, गिरणारे गावात पसरल्यानंतर मोठ्या संख्येने गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना कळवूनदेखील पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. पोलिसांची करावी लागणारी प्रतीक्षा आणि टेम्पोचालकाने घटनास्थळावरून केलेल्या पलायनामुळे जमाव संतप्त झाला. यावेळी जमलेल्या जमावाने संतप्त होत टेम्पो पेटवून दिला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पेटत्या टेम्पोमुळे वाहतूक ठप्प झाली. सदर घटना समजताच पोलीस अधीक्षक कार्यालयातून दखल घेण्यात आली आणि दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी जमावाला पांगवून तत्काळ पेटलेला टेम्पो विझविण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी टेम्पो पडल्यामुळे पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. यावेळी अग्निशामक दलाच्या सातपूर उपकेंद्राचा बंब घटनास्थळी पोहचला. जवानांनी तत्काळ पेटलेला टेम्पो विझविला; मात्र तोपर्यंत टेम्पोचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. पोलीस कर्मचारी संजय सांगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीत सुमारे तीन लाख ४७ हजार रुपयांचे नुकसान आगीमध्ये झाल्याचे म्हटले आहे. बोबडे हा महावीर तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. याबाबत अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

.

टॅग्स :fireआगNashikनाशिकAccidentअपघात