नांदगाव : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील नस्तनपूरजवळ घडली. ज्ञानेश्वर अंबादास बच्छाव (२५, रा. हिंगणे देवरे) असे मृताचे नाव आहे. याबाबत माणिक रंगनाथ बच्छाव यांनी नांदगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (दि.२२) नांदगाव-चाळीसगाव रोडवर भरधाव वेगाने धावणार्या ओमनी कार (एमएच १८ डब्ल्यू ३६५३) व दुचाकी (एमएच २१ ए ४१४६) यांच्यात धडक झाली. त्यात दुचाकीस्वार ज्ञानेश्वरची प्राणज्योत मालवली.
कार-दुचाकी अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 15:18 IST