अज्ञात वाहनाच्या धडकेत डुबेरे येथील युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 17:40 IST2019-03-21T17:40:17+5:302019-03-21T17:40:34+5:30
सिन्नर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने डुबेरे येथील २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत डुबेरे येथील युवक ठार
सिन्नर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने डुबेरे येथील २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील डुबेरे येथील सुनील उत्तम वाजे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. हा युवक कामावरून परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. बुधवारी (दि.२०) रोजी रात्री बारा वाजता के. एस. बी कंपनीमधून मोटारसायकल वरून बायपास मार्गे घराकडे परतत असताना सरदरवाडी जवळ पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर मार लागल्याने सुनीलचा मृत्यू झाला. तर मोटारसायकलचा अक्षरश: चुराडा झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. मनिमळाऊ स्वभाव असल्याने मित्र परिवाराला धक्का बसला आहे. सुनीलच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.