चांदवडला कोविड सेंटरच्या बाहेरच युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:33+5:302021-04-22T04:14:33+5:30

चांदवड (नाशिक) : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या बाहेरच मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील ...

A youth died outside the Kovid Center in Chandwad | चांदवडला कोविड सेंटरच्या बाहेरच युवकाचा मृत्यू

चांदवडला कोविड सेंटरच्या बाहेरच युवकाचा मृत्यू

चांदवड (नाशिक) : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या बाहेरच मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील वडनेरभैरवजवळील दीड किलोमीटर अंतरावरील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी (३५) हा मंगळवार, २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी सुरेखा हिच्याबरोबर चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर येथे तब्बेत बरी नसल्याने तपासणीसाठी आला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याने बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. माळी यांची ऑक्सिजन लेव्हल अगदी ३० ते ३५ पर्यंतच होती. त्यामुळे हा रुग्ण कोविड सेंटरच्या पायरीजवळ कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात स्ट्रेचरवर नेवून डॉ. सोनवणे यांनी तपासणी केली. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगी आरती असून, ती सध्या नववीत आहे तर मुलगा आदित्य आठवीत आहे.

-------------------

रूग्ण गंभीर अवस्थेत

कोरोना रुग्ण हा वेळेत रुग्णालयात आला व तपासणी केली, औषधोपचार घेतले तर बरा होतो. हा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आल्याने हा प्रकार घडला. शेवटी डॉक्टरही देव नाही. याकरिता थोडी लक्षणे असताना रुग्णांनी आजार न लपवता वेळेत औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

- डॉ . सुशीलकुमार शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चांदवड

Web Title: A youth died outside the Kovid Center in Chandwad