प्रवक्ता निवडीसाठी यूथ काँग्रेसची ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:57+5:302021-09-19T04:15:57+5:30
नाशिक : जिल्हा युवक काँग्रसतर्फे प्रवक्तापदाच्या निवडीसाठी पक्षाच्या ‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून, ...

प्रवक्ता निवडीसाठी यूथ काँग्रेसची ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा
नाशिक : जिल्हा युवक काँग्रसतर्फे प्रवक्तापदाच्या निवडीसाठी पक्षाच्या ‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रियेचा शनिवारी (दि.१८) युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता संजीव शुक्ल यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे.
युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असून, या माध्यमातून तालुकास्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तापदी नियुक्ती मिळणार आहे. याच पद्धतीने राज्य व राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी नि:पक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती संजील शुक्ल यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिली, भारतीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यातील प्रवक्ता निवडीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून २०२० मध्ये याच उपक्रमातून विविध स्तरांवर पक्ष प्रवक्तापदाची जबाबदारी सोबविण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रवक्ता कृष्णा तवले, दर्शन पाटील, आकाश घोलप आकाश गरड, सलमान काझी, पवन आहेर आदी उपस्थित होते.
180921\18nsk_34_18092021_13.jpg
‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेच्या नोंदणीचा शुभारंभ पत्रकाचे अनावरण करताना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता संजीव शुक्ला मवेत स्वप्निल पाटील, कृष्णा तवले, दर्शन पाटील, आकाश घोलप, आकाश गरड आदी