युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 23:58 IST2020-06-28T23:51:12+5:302020-06-28T23:58:14+5:30
पेठ येथील एका अविवाहित युवकाने स्वत:च्याच आयशर वाहनाच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आमहत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
पेठ : येथील एका अविवाहित युवकाने स्वत:च्याच आयशर वाहनाच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आमहत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पेठ येथील वैभव उर्फ भैय्या बाळासाहेब शिरसाठ (२५) हा युवक शनिवारी सायंकाळी आयशर गाडी घेऊन पेठ -बलसाड रस्त्यावरील वांगणी शिवारात आला. रस्त्याच्या कडेला वाहन ऊभे करून मागच्या बाजूला गाडीतच त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रवि करवंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.