आडवाडी येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:48+5:302021-09-02T04:29:48+5:30

-------------------- प्रहारच्या सदस्य नोंदणीस प्रतिसाद सिन्नर: तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेस प्रतिसाद लाभत आहे. नायगाव गटातील वडझिरे ...

Youth commits suicide at Adwadi | आडवाडी येथे युवकाची आत्महत्या

आडवाडी येथे युवकाची आत्महत्या

--------------------

प्रहारच्या सदस्य नोंदणीस प्रतिसाद

सिन्नर: तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेस प्रतिसाद लाभत आहे. नायगाव गटातील वडझिरे गावात सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे, दिव्यांग संघटनेचे सुनील जगताप, डॉ. नीलेश कराड, अमोल नागरे, बाळू सानप, संतोष काकडे, अक्षय ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------

आधार तीर्थ आश्रमास साहित्य भेट

सिन्नर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी जवळील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे आधार तीर्थ आश्रम या संस्थेस ओवी ट्रेडर्सचे संचालक, दिव्यांग योगेश चिखले यांनी आश्रमातील ८० मुला-मुलींना दैनंदिन जीवनातील साहित्य व एक वेळचा नाश्ता भेट म्हणून दिला. चिखले यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुला-मुलींना मदत करण्याचा संकल्प यावर्षीही पूर्ण केला आहे. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक अशोक पाटील, शिवाजी चिखले, स्वप्नील बिरे व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

------------------

पालकत्व गमावलेल्या मुलांना मदत

सिन्नर: साईकृपा सोशल फाउंडेशन मार्फत कोरोनामुुळे पालकत्व गमावलेल्या कुटुंबीयांना एक आपुलकीचा हात उपक्रमांतर्गत अत्यावश्यक साहित्य वितरित करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. डॉ. संदीप शिंदे, रवींद्र कांगणे, रामनाथ म्हस्के यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून समुपदेशन केले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शिंदे, सदस्य सचिन बोरसे, चंदन उगले, आर. एम. सानप, सुयोग गुरुळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Web Title: Youth commits suicide at Adwadi