यूथ क्लबचा सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:58 IST2018-10-12T00:57:44+5:302018-10-12T00:58:07+5:30

येथील द ड्रीम अ‍ॅचिव्ह यूथ क्लबच्या वतीने (नेपाली युवा क्लब) आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.

Youth Club Cultural Festival | यूथ क्लबचा सांस्कृतिक महोत्सव

यूथ क्लबचा सांस्कृतिक महोत्सव

ठळक मुद्देपारंपरिक-आधुनिक नृत्य : नाटक, गायनाचे कार्यक्रम

नाशिक : येथील द ड्रीम अ‍ॅचिव्ह यूथ क्लबच्या वतीने (नेपाली युवा क्लब) आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास नेपाळी संचारकर्मी आणि मॉडेल मिलन विश्वकर्मा तसेच भाजपाचे युवा नेता रम्मीभाई राजपूत उपस्थित होते. आधुनिकतेच्या काळात परंपरा जपल्या पाहिजेत, परंतु त्याचबरोबर आधुनिक जगाबरोबर चालले पाहिजे तरच युवाशक्तीचा विकास होईल, असे सांगून मिलन विश्वकर्मा यांनी तरुणाईच्या उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा राना यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सुमी ददेल, क्लबचे अध्यक्ष करन शिरपाई, सचिव किशोर विश्वकर्मा, राज सोनार आदी उपस्थित होते. जनसेवा बहुद्देशीय सेवा संस्था व आंतरराष्ट्रीय नेपाली समाज, भारत यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.
‘रमाईलो दैसे झिलमिली तिहार’
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरात ‘रमाईलो दैसे झिलमिली तिहार’ भाग दोन अशा शीर्षकाखाली झालेल्या या कार्यक्रमात पारंपरिक तसेच आधुनिक नृत्य, नाटक आणि गायनाचे कार्यक्रम पार पडले. त्यातून पारंपरिक सणांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Web Title: Youth Club Cultural Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.