युवकाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; नाशिकमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 13:47 IST2021-11-18T13:46:55+5:302021-11-18T13:47:11+5:30
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.

युवकाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; नाशिकमधील घटना
विंचूर (नाशिक) : येथे आज सकाळी निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील भाऊसाहेब सखाहरी साबळे या युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्याला रोखत लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार टळला. डोंगरगाव येथील भाऊसाहेब साबळे याने शेत रस्त्याचा वाद व उपसरपंच राजीनामा देत नाही असे कारणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमधून होती.