लुटीचा बनाव करणाऱ्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:27+5:302021-02-05T05:47:27+5:30

बुधवारी, (दि. २७) शहरातील क्सिस ग्रामीण मायक्रो फायनान्स कंपनीचा कर्मचारी असलेल्या रामकृष्ण एकनाथ सैंदाणे (२१, रा. कोळबा, ता. ...

Youth arrested for looting | लुटीचा बनाव करणाऱ्या तरुणास अटक

लुटीचा बनाव करणाऱ्या तरुणास अटक

बुधवारी, (दि. २७) शहरातील क्सिस ग्रामीण मायक्रो फायनान्स कंपनीचा कर्मचारी असलेल्या रामकृष्ण एकनाथ सैंदाणे (२१, रा. कोळबा, ता. चोपडा, जि. जळगाव) याने टीव्हीवरील क्राइम सीरिअल पाहून स्वतःच्याच लुटीचा बनाव रचला. ९७ हजार १७० रुपये रक्कम, तसेच टॅब व मोबाइल असा एकूण १ लाख १९ हजार १७० रुपयांची येवला-मनमाड रस्त्यावर लूट झाल्याची तक्रार पोलिसात केली.

पोलिसांच्या जाब-जबाबादरम्यान, घटनेबाबत विसंगती आढळून आली. पोलीस निरीक्षक अनिल भवारी व सहकाऱ्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच, रामकृष्ण सैंदाणे याने लुटीचा बनाव केल्याचे सांगत, अनकाई येथील रेल्वे पुलाच्या बाजूला लपवून ठेवलेला ऐवज त्याने काढून दिला. कंपनीचे राजू बटदेवार यांनी नोंदविलेल्या फिर्यादीनुसार तालुका पोलिसांनी रामकृष्ण सैंदाणे याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Youth arrested for looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.