ओझर महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’
By Admin | Updated: August 2, 2016 01:13 IST2016-08-02T01:13:40+5:302016-08-02T01:13:54+5:30
ओझर महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’

ओझर महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’
ओझर टाऊनशिप : येथील ओझर विकास संस्था संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘पोलीस आपल्या भेटीस’ कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.एन. ढोकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ओझरचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट होते. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व्ही. एफ. अत्रे, संस्थेचे समन्वयक राजेंद्र सोनवणे, शिक्षणाधिकारी एन. यू. सोनवणे, एमबीएचे प्राचार्य बनसोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थी विशाल गांगुर्डे याने पोलीस प्रशासन
या विषयावर कविता सादर केली.
या कवितेतून त्याने पोलीस जीवनातील वास्तव मांडले. प्रा. एस. के. जावळे यांनी प्रास्ताविक
केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना नवीन अॅपविषयी
माहिती दिली. सूत्रसंचालन आर. के. पगारे यांनी केले. आभार प्रा. अहेर यांनी मानले. (वार्ताहर)