तुमची वारी लई भारी, आम्ही मात्र बरे घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:54+5:302021-06-20T04:11:54+5:30
- नामदेव भोर ------- आधी चहा मग पाेलिसांनी पोलिसांना टीप दिली... सध्या निर्बंधामुळे दुकानदार हैराण झाले आहेत. दुकाने सुरू ...

तुमची वारी लई भारी, आम्ही मात्र बरे घरी
- नामदेव भोर
-------
आधी चहा मग पाेलिसांनी पोलिसांना टीप दिली...
सध्या निर्बंधामुळे दुकानदार हैराण झाले आहेत. दुकाने सुरू झाली तरी काही ना काही कारण काढून सरकारी पाहुणे कारवाईसाठी हजर! बरे तर चार वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार, त्यामुळे किमान ग्राहक असेपर्यंत दुकाने सुरू ठेवा पण तसे नाही. गंगापूर रोडवरील एक चहाचे दुकान चार वाजेपर्यंत सुरू ठेवायचे असताना प्रत्यक्षात मात्र ग्राहक असल्याने दुकानदारही रेंगाळला. काही वेळाने पोलिसांची व्हॅन आली आणि त्यातून चार पोलीस उतरले. दुकानदार काहीसा घाबरला, परंतु पोलिसांनी चहाची ऑर्डर दिल्याने सुखावला. चार चहा दिले. चहापानानंतर पोलिसांनीही त्या दुकानदाराने नको नको म्हणत असताना पैसेही दिले. दुकानदार खुश! मात्र, काही वेळ गेला आणि आणखी एक पोलीस व्हॅन आली. चहावाल्याला उचलला आणि बसवला गाडीत. दुकानदार भांबावला. गयावया करू लागला. तर म्हणे चार वाजेनंतरही दुकान सुरू का ठेवले, म्हणून पावती फाडली. अहो दादा, तुमच्या आधी पोलीस आले, ते चहाही पिऊन गेले, बिल दिले पण ते काहीच नाही बोलले, अशी दुकानदाराने गयावया केली. यावर एकाने त्यांनीच आम्हाला दुकान सुरू असल्याचे सांगितले, असे पोलिसांनी सांगताच दुकानदाराने डोक्याला हात लावला.
- संजय पाठक