शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तेरा संशयित तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:40 IST

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितांची यादी परिमंडळ-१ मधील पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३ जुगार अड्डे चालविणाºयांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणाऱ्या संशयितांची यादी परिमंडळ-१ मधील पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३ जुगार अड्डे चालविणाºयांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़  उपआयुक्त पाटील यांनी परिमंडळ-१ च्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणेनिहाय जुगार अड्ड्यांवर टाकलेले छापे व छाप्यानंतरही पुन्हा सक्रिय झालेले व छापे टाकून पकडलेल्या जुगार अड्डे चालविणाºया संशयितांची २०१५ ते २०१८ अशी तीन वर्षांची यादी तयार केली़ या माहितीनुसार भद्रकालीतील तेरा जुगार अड्डे चालविणाºयांविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ तडीपार करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सलिम अब्दुल रेहमान पठाण (४७, रा. घ. नं. १२२७, तलवाडी, भद्रकाली) या टोळीप्रमुखासह धर्मा ऊर्फ धर्मराज पुंजाराम सोनवणे (३५, रा. गंगापूर गाव), अशोक ऊर्फ सुभाष तुकाराम महाले (४०, रा. तेलंगवाडी, फुलेनगर, पंचवटी), अहमद अख्तर खान (२८, रा. मिनार मस्जिदसमोर, मुलतानपुरा, भद्रकाली), किशोर रामलाल अहेर (३७, रा. खडकाळी, भद्रकाली), उत्तम वामन वाघ (५०, रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, भद्रकाली), भारत लक्ष्मण भडांगे (३२, रा. जगतापवाडी, सातपूर), परसराम रामदास आव्हाड (३३, रा. पाटील गल्ली, जुने नाशिक), रियाज अजिज शेख (३२, रा. घ. नं. १३४०, खडकाळी, भद्रकाली), मच्छिंद्र राधाकिसन खांबेकर (४५, रा. बुधवार पेठ, पाण्याचे टाकीजवळ), सचिन शरद इंगोले (२०, रा. जुम्मा मस्जिद, जुने नाशिक), अजिज गणी शेख (४२, रा. घ. नं. २३५५, बडी दर्गा) विष्णू बाबूराव आदमाने (२५, रा. निलगिरी बाग, औरंगाबादरोड) यांचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील अजून नऊ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई सुरू आहे़पोलीस उपआयुक्तांनी यापूर्वी भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील दोन टोळ्यांच्या हद्दपार प्रस्तावातील ३० संशयितांना शहर व जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते़ गतवर्षी २३, तर चालू वर्षात ५७ अशा ८० सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा