शाळांमध्ये शुल्क आकारणीचा फलक लावण्याची मागणी आपचे निवेदन : मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे आश्वासन
By Admin | Updated: May 31, 2014 02:05 IST2014-05-31T00:14:42+5:302014-05-31T02:05:05+5:30
नाशिक : प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने शुल्क आकारणीसंबंधीचा फलक लावावा आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदेशिररीत्या शुल्क उकळणार्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांबाहेर फलक लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे आपचे संयोजक जितेंद्र भाबे यांनी म्हटले आहे.

शाळांमध्ये शुल्क आकारणीचा फलक लावण्याची मागणी आपचे निवेदन : मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे आश्वासन
नाशिक : प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने शुल्क आकारणीसंबंधीचा फलक लावावा आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदेशिररीत्या शुल्क उकळणार्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांबाहेर फलक लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे आपचे संयोजक जितेंद्र भाबे यांनी म्हटले आहे.
आपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे, बेकायदेशीर प्रवेश शुल्क व देणगी उकळणार्या शाळा-महाविद्यालयांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अकार्यक्षम अधिकार्यांवर कारवाई व्हावी, बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेले शुल्क परत करावे या मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालकांबरोबरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनाही देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड. प्रभाकर वायचळे, महानगर समन्वयक जितेंद्र भाबे, जगबीरसिंग, अल्ताफ शेख, दीनानाथ चौधरी, ॲड. मीनल भोसले, सचिन शिनगारे. सौ. कंचन ढाकणे, प्रियदर्शन भारतीय, राजू आचार्य, संजय तांबे, एकनाथ सावळे, मोनीत शेख आदि उपस्थित होते.