नाशिक : कौटुंबिक कारणावरून मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून करणाºया संशयित आरोपी असलेल्या लहान भावाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी (दि.२३) सकाळी पेठ रोडवरील नामको हॉस्पिटल जवळ संशयित सुनील थोरे याने त्याचा मोठा भाऊ संतोष थोरेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली होती.संतोष हा सुनील काम करत असलेल्या गाळ्यावर गेला होता त्यानंतर सुनील त्याला घेऊन विद्यानगर येथे राहत्या घरी दुचाकीवरून घरी जात असताना संतोष याने दारू पिण्यासाठी गाडी थांबव या कारणावरून वाद घातले होते परंतु सुनीलने गाडी न थांबल्याने संतोषने चालत्या गाडीतून उडी मारली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले व त्यातून संतापलेल्या सुनीलने संतोषच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मयत दारू पिऊन त्रास देत असल्याने अनेकदा वाद निर्माण व्हायचे. काल सुनील याने भावाचा खून केल्यानंतर तो घरी निघुन गेला. पंचवटी पोलिसांनी घटनेनंतर सुनीलला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मोठ्या भावाला ठार मारणाऱ्या धाकट्या भावाची तुरूंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:44 IST