शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:37 IST

नाशिक शहरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील  पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सकाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.  

ठळक मुद्देपंचवटी परिसरात कौटुंबिक वादातूनखून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील  पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सक ाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबादरोड विद्यानगर परिसरात राहणाºया संतोष सखाराम थोरे (४०) याची त्याचा लहान भाऊ सुनील सखाराम थोरे (३५ )याने दगड घालून हत्या केली. या प्रकरणी संशयित सुनिल सखाराम थोरे (३५) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष व सुनिल हे दोघे सख्खे भाऊ विद्यानगर येथे राहत असून संतोष बाजारसमितीत हमाली काम करत होता. तर सुनिल पेठरोड बाजारसमिती येथे मापारी काम करतो. मंगळवारी सकाळी मयत संतोष हा सुनिल काम करत असलेल्या बाजारसमितीतील गाळ्यावर गेला असताना मालकाने सुनिलला फोन करून तुझा भाऊ दारू पिऊन येथे शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर सुनिल संतोषला गाडीवर बसवून घरी सोडण्यासाठी जात असतांना संतोषने दारू प्यायची असल्याचे सांगत गाडी थांबवायला सांगितली. मात्र सुनिलने गाडी थांबविली नाही, त्यावरून दोघात बाचाबाची झाली असता संतोषने चालत्या गाडीवरून नामको हॉस्पिटलजवळ उडी मारली. त्यानंतर संतापाच्या भरात सुनिल याने मोठा दगड हातात उचलून संतोषच्या डोक्यात टाकला. हा  घाव वर्मी बसल्याने संतोषचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवाडे, संतोष काकड, शेखर फरताळे, महेश साळुंके, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, या घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी संशयिताचा सुनील याचा माग घेत त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असून शेवटचे वृत्त मिळेपर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पंचवटीतल मोरे मळा परिसरातही तीन आठवड्यांपूर्वी अशाचप्रकारे कौटुंबिक वादातून दिराने भावजयीवर राहत्या घरातच धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसMurderखूनFamilyपरिवार