आहुर्लीत वीज पडून तरूणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:44 IST2020-09-11T15:44:25+5:302020-09-11T15:44:35+5:30

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथे गुरुवारी ( दि.१० ) सायंकाळी अंगावर वीज पडून तरूणीचा मृत्यू झाला.

A young woman was killed in a lightning strike in Ahurli | आहुर्लीत वीज पडून तरूणी ठार

आहुर्लीत वीज पडून तरूणी ठार

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथे गुरुवारी ( दि.१० ) सायंकाळी अंगावर वीज पडून तरूणीचा मृत्यू झाला. सायंकाळ दरम्यान विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. शेतावर चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना आणण्यासाठी गेलेल्या आरती हिरामण गायकर ( वय १७ ) या तरुणीचा वीज अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हवालदार सुहास गोसावी यांनी घटनास्थळी भेट देत गावकऱ्यांसमोर पंचनामा केला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A young woman was killed in a lightning strike in Ahurli

टॅग्स :Nashikनाशिक