चारचाकी वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:09 IST2020-01-18T00:56:50+5:302020-01-18T01:09:14+5:30
रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. मयत तरुणी टिष्ट्वंकल जगदीश नगरे ही मूळची धुळे येथील असून, नाशिक शहरात ती आपल्या मामाक डे शिक्षणासाठी आलेली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारचाकी वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
नाशिक : रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. मयत तरुणी टिष्ट्वंकल जगदीश नगरे ही मूळची धुळे येथील असून, नाशिक शहरात ती आपल्या मामाक डे शिक्षणासाठी आलेली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाºया एम.एच. १७, ए.जे. ७६८४ या स्विफ्ट कारने टिष्ट्वंकल नगरे हिला जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर वाहनचालकाने जखमी अवस्थेतील टिष्ट्वंकल नगरे हिला जमलेल्या नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, या अपघातात टिष्ट्वंकल हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात निधन झाले. याप्रकरणी मयत टिष्ट्वंकल नगरेचे मामा सुनील बापूराव जाधव (रा. उत्तमनगर, सिडको) यांनी स्विफ्ट वाहनचालकाविरोधात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याची फिर्याद दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.