घागबारी शिवारात कार अपघातात तरुणीचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 01:04 IST2020-12-23T22:34:58+5:302020-12-24T01:04:39+5:30
वणी : बोरगाव येथून नाशिकला कारमधून जाणाऱ्या डॉक्टरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घागबारी शिवारात कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात डॉक्टर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला.

घागबारी शिवारात कार अपघातात तरुणीचा मृत्यु
वणी : बोरगाव येथून नाशिकला कारमधून जाणाऱ्या डॉक्टरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घागबारी शिवारात कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात डॉक्टर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला.
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे डॉ. प्रकाश गायकवाड हे खाजगी प्रॅक्टीस करतात. बुधवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास कन्या प्रज्ञा हिच्या समवेत कारने वणी-सापुतारा रस्त्यावरुन नाशिक येथे मार्गक्रमण करत असताना घागबारी शिवारात अनपेक्षित पणे डॉक्टरांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या या दोघांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रज्ञा हिला दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यातआले, तर डॉ. प्रकाश गायकवाड यांना नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्रज्ञा या नुकत्याच अभियंता पदवी परिक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येतआहे. दरम्यान प्रज्ञा यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे.